पोस्ट्स

प्रकाश.

  बघता बघता दिवाळीची सुट्टी संपली. पंधरा दिवस शेवरीच्या कापसासारखे भुर्रकन उडून गेले. नाहीतर शाळेतला एक तास एका दिवसासारखा, संपता संपत नाही. त्यात मधल्या सुट्टीनंतर रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र अशा किचकट विषयांचा तास असेल तर जास्तच कंटाळा येणार. हातात घड्याळ नसल्यानं किती वाजलेत समजायचं नाही, म्हणून खिडकीतून वर्गात डोकावून पाहणाऱ्या सूर्याच्या किरणांची खूण ठेवायचा प्रयत्न केला, पण सूर्यमहाराज कधी वेळेवर नसायचे. तास सुटताना खूण करून ठेवली तर, दुसऱ्या दिवशी ते भलतीकडेच असणार, त्यामुळे सूर्यावर जाम चिडलो मनात ठरवून टाकलं, चंद्र, तारे तोडून आणणाऱ्या एखाद्या येडपटला गाठावं, शिडीवर शिडी, शिडीवर शिडी असं करत-करत ढगाजवळ पोहोचावं, ढगांवर उभं राहून सूर्य तोडून आणावा, चांगली अद्दल घडेपर्यंत त्याला थंड पाण्याच्या डोहात डुबवून काढावा. हल्ली असे खुळ्यासारखे काहीही विचार माझ्या डोक्यात घोळत राहतात, पण उगाचच कुणी आपल्यावर हसायला नको, म्हणून मी कुणाला सांगत नाही एके दिवशी सरानी विचारलं,"सांगा पाहू, सूर्य उगवला नाही, तर काय होईल. तसा आमच्या वर्गातील चोंबडा उठला. तसं त्याच नाव विजय, पण! मस्ती करणाऱ्या

भटकंती

 "घरातून बाहेर पडलास तर तंगड्या तोडून हातात देईन," आईनं दम दिलेला. दम देण्याची तिची ही नेहमीची पद्धत.मला माहित होतं आपल्या तंगड्या बिंगड्या काही तूटणार नाहीत, पण! रट्टे पडतील या भीतीने डोळे बंद करून खाटेवर नुसता पडून होतो. डोळ्यासमोर दिसत होते उनाडक्या करत हिंडणारे मित्र. कितीही प्रयत्न केला तरी झोप येत नव्हती. दुपार चांगलीच तापली होती.संध्याकाळी झाडांना गदगदा हलवणारा वारा म्हाताऱ्या माणसासारखा कुठेतरी झोप काढत असावा. कूस बदलावी तशी झाडाची पानं मधूनच हलू लागायची अन् वाटायचं वाऱ्याची गार झुळूक अंगाला स्पर्श करून जाईल. पण! तसं होत नव्हतं. खूपच उकडत होतं. रोज उन्हातून खेळत होतो, रानातून हिंडत होतो, पण! एवढा उकाडा कधी जाणवला नव्हता. आता, कोंडून पडल्यामुळे त्याची जाणीव होत होती.  खुपच बैचेन वाटू लागलं म्हणून आईला हळू आवाजात हाक मारली. पण, तिने ओ दिला नाही म्हणजे ती नक्कीच झोपली असावी. असा विचार करून हळूच खाटेवरून उठलो, पायात चप्पल चढवल्या अन घराबाहेर पडलो.         वाटलेलं सगळे मित्र बाळूच्या दुकानात असतील, म्हणून दुकानात आलो तर, इथे कुणीच नव्हतं. बाळूचं दुकान वाडीच्या बाहेर,दुपारच

हा उन्हाचा गाव आहे

हा उन्हाचा गाव आहे रापलेली माणसे का अशी ही श्रावणाने शापलेली माणसे. जात धर्माच्या इथे ही पेटता या दंगली पाहिली मी माणसाने छाटलेली माणसे. शेत कसवी तोच येथे का उपाशी राहतो? का इथे ही भाकरीने ग्रासलेली माणसे. पाहतो तो हर घडीला चेहरा वाटे नवा चेहऱ्याला रंग फसवे फासलेली माणसे. हो भले अथवा बुरे ना काळजी येथे कुणा का मनाने येथली ही गोठलेली माणसे?

मेघ भरून येताना

इमेज

हा रिमझिम झरता श्रावण......

इमेज

yeshil tu ki hi manachi bhul aahe

yeshil tu ki hi manachi bhul aahe